रविवार, २२ डिसेंबर, २०२४

एक एकर पिंक तैवान पेरू बाग लागवडीसाठी येणारा खर्च

 एक एकर पिंक तैवान पेरू लागवडीसाठी येणारा खर्च:


1. रोपांचा खर्च:

दोन रोपांमध्ये पाच फूट बाय नऊ फूट अंतर ठेवले असता एका एकरामध्ये 968 रोपे लागू शकतात. 40 रुपये याप्रमाणे सरासरी भाव धरला तर 968 × 40 = 38720/-- खर्च होईल.

रोपांतील अंतर कमी जास्त केले तर रोपांची संख्या ही कमी जास्त होईल आणि त्याप्रमाणे खर्चही बदलेल तसेच नर्सरी ही खूप प्रमाणात वाढत असल्यामुळे प्रतिस्पर्धा वाढत आहे आणि परिणामी रोपांचा भावही कमी जास्त होत आहे.

या गोष्टी लक्षात घेऊन आपण प्रति एकर सरासरी रोप लागवडीचा खर्च 35000 रुपये धरू.

2. मशागत, खाते व लागवडीसाठी मजुरीचा खर्च: 

रोपे आणल्यानंत जमिनीची मशागत करणे गरजेचे असते, ज्या जमिनीवर रोप लागवड करणार आहोत तिची नांगरणी करून घाण कचरा काढून घेणे आवश्यक असते, त्यानंतर ठरवलेल्या अंतरावर खड्डे करून त्या खड्ड्यांमध्ये खत टाकले जाते. यासाठी लागणारा खर्च आपण बघू-

• रोपांसाठी आखणी - 1000/-

• जमिनीची मशागत - 4000/-

• खड्डे व खत - 5000/-

• रोपे लावण्याची मजुरी- 4000/-

3. सिंचन खर्च: 

पेरू बाग लावली म्हणजेच तुम्ही बाग पुढचे वीस वर्षाचे तरी टार्गेट ठेवून लावू शकतात. दरवेळी पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी देणे अधिक मेहनतीचे काम असते याचा चांगला विकल्प म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन. हा एक मोठा खर्च आहे पण व्यवस्थित काळजी घेतली तर दहा ते बारा वर्षे पाणी देण्याची चिंता राहत नाही. तसेच ठिबक सिंचनासाठी सरकार 50% पेक्षा जास्त सबसिडी देते. याचा लाभ तुम्ही घेऊन खर्च कमी करू शकता. आपण सध्या हा खर्च हिशोबत घेऊनच गणित मांडू. 

तर प्रती एकर चांगल्या क्वालिटी चे ठिबक केल्यास 80000-90000 खर्च अपेक्षित आहे.

4. लागवडीनंतरचा खर्च: 

लागवडीनंतर वर्षभर बागेचे नियंत्रण करावे लागते यात झाडांच्या आजूबाजूचे तन खुरपणे, झाडांची कटिंग करणे, वर्षाच्या आतच कळ्या धरायला सुरुवात झाली तर कळ्या तोडणे असे छोटे मोठे वार्षिक खर्च येतात. हा खर्च 15000 ते 20000 रूपये येऊ शकतो.

5. खत व किटकनाशक फवारणी खर्च:

रोपे लावण्याआधी शेणखत, छाटणी नंतर दाणेदार खत, सहाव्या महिन्यात शेणखत व सिंगल सुपर फॉस्फेट आणि मजुरी चा साधारण खर्च 25000 ते 30000 येऊ शकतो.

पेरुला रोगांचे प्रमाण कमी असल्यामुळे फवारणीची फारसी गरज भासत नाही, पण ढगाळ वातावरण झाल्यास मा कीड पडण्याची शक्यता असते, त्यावर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, फुल सेटिंग होत असताना फळ गळती रोखण्यासाठी बुरशीनाशक वापरावे लागू शकते, हा खर्च 7000 ते 10000 येऊ शकतो.



6. फळांसाठी फोम बॅग खर्च: 

फोम बॅग वापरणे बंधनकारक नाही पण फळांची क्वालिटी आणि पक्षांपासून सुरक्षा या बाबी लक्षात घेता फोम बॅग वापरणे फायदेशीर ठरते. एक एकर क्षेत्रासाठी 40000 ते 45000 रुपये फोम बॅगचा खर्च येतो. फोम बॅग लावण्याची मजुरी 15000 रुपये येऊ शकतो. हा खर्च वाजवी पेक्षा जास्त वाटत असला तरी, फळाची कॉलिटी चांगली येत असल्यामुळे प्रति किलो भाव खूप चांगला मिळतो.

वर नमूद केलेला एकरी एकुण खर्च 230000 ते 260000  रुपयांपर्यंत येऊ शकतो. यातील काही खर्च फक्त सुरवातीला येतो, जसे की रोपे, लागण, ठिबक इत्यादी. त्यामुळे दुसऱ्या वर्षापासून हा खर्च कमी होत जातो.तसेच तुमची सेंद्रिय पद्धतीने शेती करणार असाल तर आंतरमशागत खर्च कमी होतो, तसेच फावरण्यांचा खर्च ही वाचवू शकतो, मजूर घरचेच असेल तर तो खर्च ही तुम्ही वगळून हिशोब करू शकता.


या लेखात आपण खर्चाबाबत  चर्चा केली. पुढे येणाऱ्या लेखांतून पेरूची पूर्ण अर्थकारण समजून घेऊ.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Guide to Oil Palm Plantation Methods

  A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...