शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

पिंक तैवान पेरू लागवड आणि नियोजन कसे करावे?

 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास आणि थोडक्यात माहिती:

पिंक तैवान पेरू हा गोड चविचा आकर्षक गुलाबी गर असलेला आणि पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असल्यामुळे आणि जग प्रसिद्ध असा एक विशेष प्रकार आहे. 

महाराष्ट्रातील स्थानिक आणि परराज्यातील बाजारपेठेत वाढत्या मागणीमुळे, पिंक तैवान पेरूची लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक लाभदायक उपक्रम ठरू शकतो. 

मी माझ्या या लेखातून, पिंक तैवान पेरूची लागवड कशी करावी आणि लागवडी नंतर चे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.




पिंक तैवान पेरूची काही ठळक  वैशिष्ट्ये: 

 फळ कसे दिसते:  

पिकलेल्या अवस्थेत हिरव्या रंगाचे फळ पिवळसर रंग धारण करते, ज्यामध्ये गुलाबी गर असतो. गुलाबी गर ही ह्या फळाचा खरी ओळख.

फळाची चव

पिंक तैवान पेरूची चव गोडसर आणि किंचित आंबट, ज्यामुळे हे फळ ताजे खाण्यासाठी, ज्यूस आणि डेझर्टसाठी उपयोगी असते.

फळातील पोषक मूल्य: 

हे फळ विटामिन C, अँटिऑक्सिडंट्स, आणि फायबर्स चे समृद्ध स्रोत .

तग धरण्याची क्षमता: 

विविध माती आणि हवामान असलेल्या परिस्थितींमध्ये वाढू शकते, तसेच कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते.


पिंक तैवान पेरू बागेची लागवड करताना जागेची निवड  आणि पूर्वतयारी:

१. हवामान आवश्यकता

  • तापमान: २०°C ते ३५°C.
  • पर्जन्यमान: वार्षिक १०००–१५०० मिमी, परंतु पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.

२. मातीची स्थिती

  • मातीचा प्रकार: काळी, लाल, मुरमाड, माळरानाची तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन उत्तम. 
  • मातीचा pH : ५.५ ते ७.० सर्वोत्तम वाढीसाठी.
  • पूर्वतयारी: जमीन चांगली नांगरून भुसभुशीत करावी, तण काढून, कचरा, पालापाचोळा काढून घ्यावा, सेंद्रिय खत जसे शेणखत, मासोळी खत किंवा गांडूळखत टाकून घ्यावे जेणे करून जमिनीची उर्वरक क्षमता वाढेल.

३. दोन रोपांमधील अंतर

 दोन रोपांमधील अंतर सामान्यतः ८ फूट × ८ फूट (२.५ मीटर × २.५ मीटर) ठेवले तरी चालते, या पद्धतीने लागवड केली असता प्रती एकर ६८१ रोपे लागू शकतात.                 याउलट सघन लागवड करण्याचा निर्णय घेतला असेल तर ५ फूट × ८ फूट (१.५ मीटर × २.५ मीटर) अंतरावर रोपे लावावी, म्हणजे १०८९ रोपे लागतील.

४. सिंचनची तयारी:

 ठिबक किंवा तुषार सिंचन प्रणालीचा वापर केला तर सुरवातीला खर्च येतो पण कायमस्वरूपी कष्ट वाचतात.


५. रोपांची निवड : रोपांचे कलम शासनमान्य नर्सरीतून घ्यावीत किंवा तुमच्या विश्र्वासातील नर्सरीतून रोपे घ्यावे . फसवणुकीचा धोका कमी होतो.

६. लागवड तंत्र

  • खड्डे: २ फूट × २ फूट × २ फूट आकाराचे खड्डे तयार करावेत.
  • लागवड कालावधी: पेरूच्या झाडाची बारा महिने लागवड करता येते.
  • खत व्यवस्थापन: सेंद्रिय खत आणि Nitrogen, phosphorous, potash आणि magnesium चा योग्य समतोल असलेले खत खड्ड्यात मिसळावे.                         


काळजी आणि व्यवस्थापन

१. सिंचन

  • तरुण झाडे: कोरड्या काळात नियमित पाणी द्यावे.
  • प्रौढ झाडे: उन्हाळ्यात ७–१० दिवसांनी आणि हिवाळ्यात कमी वारंवारतेने पाणी द्यावे.

२. छाटणी

  • महत्व: मृत किंवा आजारी फांद्या काढणे, नवीन वाढ प्रोत्साहित करणे व सूर्यप्रकाश प्रवेश सुधारण्यासाठी आवश्यक.

३. खत व्यवस्थापन

  • पहिले वर्ष: प्रति झाड २०० ग्रॅम नायट्रोजन, १०० ग्रॅम फॉस्फरस आणि १०० ग्रॅम पोटॅशियम वार्षिक द्यावे.
  • प्रौढ झाडे: हे प्रमाण वाढवून ५०० ग्रॅम नायट्रोजन, २५० ग्रॅम फॉस्फरस आणि २५० ग्रॅम पोटॅशियम प्रति झाड वार्षिक द्यावे.

४. कीड आणि रोग व्यवस्थापन

  • सामान्य कीड: फळमाशी आणि पेरू पतंग; नियंत्रणासाठी फेरोमोन ट्रॅप आणि नीम आधारित स्प्रे वापरावे.
  • रोग: अँथ्रॅक्नोज, विल्ट  रोगांसाठी बुरशीनाशक आणि स्वच्छता पद्धतींचा अवलंब करावा.


काढणी आणि त्यानंतरचे व्यवस्थापन

१. काढणी

  • परिपक्वता: फुलानंतर ४–५ महिन्यांनी फळे तयार होतात; सोनेरी-हिरव्या रंगावर काढणी करावी.

२. पश्चात हाताळणी

  • स्वच्छता: फळे धुवून, पुसून स्वच्छ करणे, खराब फळे काढून टाकावीत.
  • साठवण: १०°C–१५°C तापमानात ठेवून शेल्फ लाइफ वाढवता येते.
  • पॅकेजिंग:  EPE फोम नेट मध्ये पॅक करून कोरुगेटेड बॉक्समध्ये पॅक करणे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Guide to Oil Palm Plantation Methods

  A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...