Agriculture and agro industries updates, latest hi-tech agricultural practices news and information for farmers and Agripreneurs
मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
नारळ लागवड: शेतीपूरक व्यवसाय
पारंपारीक कृषी पद्धतीला मागे सोडून शेतकरी एकपिक पद्धतीकडे वळला खरा पण तरीही त्याचे अर्थकारण फारसे बदलेले दिसत नाही.
रसायनांचा अती वापर ही शेताची उर्वरक क्षमता नष्ट करत गेला.
हल्लीच्या पिढीने मात्र स्वतःचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या शेती पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक नावीन्यपूर्ण बदल म्हणजे फळशेती कडे वाढत असलेला शेतकऱ्यांचा कल.
आज बहुतांश शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर किमान स्वतःच्या उपयोगी पडतील एवढे फळझाडे नक्की लावतात. आज संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बांधा-बांधावर नारळ लागवड होताना दिसत आहे.
आज नारळाच्या एका वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचे अर्थकारण समजून घेऊया.
कोलंबस प्रजातीचे अर्थकारण:
कोलंबस नारळ शहाळे म्हणून प्रचलित. ओल्या पाणीदार नारळाला शहाळे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.
कोलंबस नारळ बुटके नारळ म्हणून ही ओळखले जाते त्याचे कारण झाडाची उंची फार वाढत नाही आणि विशेष म्हणजे साधारण तीन फुटापासून झाडाला फळ लागायला सुरुवात होते. हे त्याचे ठळक वैशिषट्ये.
झाडाची उंची वाढत नाही म्हणजेच शेतकऱ्याचा नारळ तोडण्याचा मोठा प्रश्न सुटला. लागवडीनंतर साधारण तिसऱ्या वर्षापासून फळ धरणी सुरू होणे अपेक्षित असते, अर्थात तुमचे नियोजन चोख असणे आवश्यक.
पहिल्या वर्षापासून सरासरी २०० नारळ प्रती झाड या प्रमाणे उत्पन्न येणे अपेक्षित असते.
पुढे झाडाचे वय वाढत जाते तसतसे फळांची संघ्या ही वाढत जाते. पाचव्या वर्षापासून ३००-४०० नारळ मिळणे ही अवघड नाही.
आता जर शेतकरी योग्य नियोजन करून आपल्या पूर्ण शेताच्या बांधावर १०० झाडे लावण्याचा संकल्प करत असेल तर १००×२००(नारळ)= २०००० नारळ किमान इतके उत्पन्न दर वर्षी घेऊ शकतो.
बाकी हिशोब मी समजावत बसत नाही. तुमच्या कडे स्थानिक मार्केट रेट काय आहे त्या प्रमाणे हिशोब करुन पहा.
आणि हो लेख वाचताना मनात चटकन विचार येणारच तुमच्या की हे कागदावरचे गणित सत्यात उतरत नाही.
नक्कीच नाही, पण तुमचे आज ही कष्ट काही कमी नाहीत,
मग तुमच्या शेतीच्या अर्थकारणाला भर घालणाऱ्या उपाययोजना करणे ही काळाची गरज...आणि तुमची ही....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Guide to Oil Palm Plantation Methods
A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...
-
Avocado Farming: A Comprehensive Guide for Indian Farmers Avocado, often considered as a "superfood," has gained immense popular...
-
A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...
-
Agritech क्षेत्र आणि रोजगार संधी Agritech क्षेत्र: पुढील ५ वर्षांत ६०,००० ते ८०,००० नवीन रोजगार संधी ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा