गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

कोलंबस नारळ शेती - लागण व व्यवस्थापन

कोलंबस नारळ शेती: आज आपण अशा एका नारळाच्या व्हरायटी बद्दल चर्चा करणार आहोत ज्याच्याबद्दल तुम्ही इंटरनेटवर गेला किंवा युट्युब वर गेला तर तुम्हाला त्या व्हरायटी बद्दल बरेच व्हिडिओ बघायला मिळतील आणि मित्रांनो त्या व्हरायटीचं नाव आहे कोलंबस. या नारळाच्या जाती बद्दल युट्युब वर बरेचशे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील किंवा गुगल वर पण तुम्हाला अशी माहिती बघायला मिळेल की या नारळाच्या झाडाला तुम्हाला वर्षाला हजार ते बाराशे नारळ मिळतील. यात किती सत्य हे पुढे बघूच. श्रीलंकेतील कोलंबो य शहराच्या नावावरून तिथल्या लोकल व्हरायटीला कोलंबस हे नाव प्रचलित होऊन आपल्या देशात आली आणि तीच्यावर प्रक्रिया करून महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर इथल्या वातावरणात एकरूप होईल अशा प्रकारे डेव्हलप केली गेली .
कोलंबस नारळाच्या लागवडीसाठी तुम्हाला जमीन कशी पाहिजे? मित्रांनो याच्या लागवडीसाठी तुम्हाला पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन पाहिजे आणि जर तुमच्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर अशा ठिकाणी य नारळाची लागवड करू नका. कोलंबस नारळाची वाढ किती होते व नारळ किती उंचीवरून लागायला सुरुवात होते? मित्रांनो कोलंबस वरायटीची उंची साधारणता 18 ते 20 फूट होते नारळ हे जमिनीपासून पाच फुटावर लागतात आणि याचा फायदा असा आहे की तुम्ही हे नारळ तुमच्या हाताने सुद्धा काढू शकता त्यामुळे तुमची जी लेबर कॉस्ट आहे ती ही कमी होणार आहे. महत्त्वाचा प्रश्न, या नारळाला खरच हजारहून अधिक नारळ दरवर्षी लागतात का? नारळाला किमान सुरुवातीचे तीन वर्ष नारळ येणारच नाहीत, त्यानंतर चौथ्या वर्षापासून अनुक्रमे 200 मग पुढच्या वर्षी किमान 300 आणि पाच वर्षांपुढील झाडांना 500 ते 550 नारळ असे उत्पन्न तुम्ही अपेक्षित ठेवू शकतात. वार्षिक 500 नारळ येणे ही कमी उत्पन्न नाही. त्यामुळे जरी तुम्हाला हजार बाराशे फळांची सेटिंग मिळत नसेल तरी पाचशे ते साडेपाचशे हे तुम्हाला दुसरी कुठली व्हरायटी देऊ शकत नाही. त्यामुळे कोलंबस ही व्हरायटी तुम्हाला खरंच एक उत्पादन मिळवून देणारी सगळ्यात चांगली व्हरायटी आणि असं नाही मित्रांनो की ही व्हरायटी सोडून दुसऱ्या व्हरायटी तुम्हाला उत्पादन देत नाहीत तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर yellow dwarf, Green dwarf किंवा गंगाबोंडम या बुटक्या व्हरायटी पण तुम्हाला २००-३०० फळांपर्यंत उत्पादन दरवर्षी मिळवून देऊ शकतात. पुढचा प्रश्न असा आहे की ह्यांची लागवड करताना आपण कशी केली पाहिजे? जर तुमची जमीन जास्त खडकाळ असेल तरच तुम्हाला खोल खड्डे घ्यायची गरज आहे, जर तुमची जमीन मुरमाळ किंवा काळी असेल तर तुम्हाला या ठिकाणी खड्डे घेण्याची गरज नाही. तुम्ही छोटे छोटे फक्त झाडाची पिशवी जाईल एवढे जरी खड्डे घेतले आणि त्यामध्ये जरी झाडे लावली तरीही हरकत नाही. आता या खड्ड्यांमध्ये तुम्हाला झाडे लावताना वाळवी लागू नये म्हणून फोरेट, सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणखत टाकावं लागणार आहे आणि तुम्हाला यानंतर झाड लावावं लागणार आहे. झाडे लावण्याआधी एकदा नर्सरी वाल्याशी चर्चा करून झाडाला मीठ झाड लावतानाच टाकायचे की एका ठराविक काळानंतर हे विचारून घ्यावे. मीठ हा खूप महत्त्वाचा घटक ठरतो नारळ उत्पादनासाठी. पाण्याचे नियोजन कसे करायचे? या व्हरायटीला खूप कमी पाणी आणि खूप जास्त पाणी याचा कोणता इफेक्ट होत नाही म्हणजे ही व्हरायटी कोणत्याही वातावरणामध्ये आणि कमी किंवा जास्त पाण्यामध्ये चांगली टिकून राहते, हा एक आपल्या शेतकऱ्यांसाठी प्लस पॉईंट आहे आणि जरी तुम्ही याला पाटाने पाणी किंवा ठिबकची सोय केली तर तुमच्यासाठी हे अतिउत्तम. या कोलंबस नारळ विषयी महत्त्वाचा प्रश्न हा की याची आपल्याला ओरिजिनल रोप कुठे मिळती? तर मित्रांनो आता तुम्हाला इंटरनेटवर असे बरेच नंबर मिळतील पण यासाठी तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला एखाद्या शासनमान्य नर्सरीतून किंवा एखाद्या चांगल्या नावाजलेल्या विद्यापीठातून तुम्ही रोपे घ्या जेणेकरून तुम्हाला रोपांची खात्री मिळेल आणि जरी तुम्ही पर्सनली कुठल्या खाजगी नर्सरीतून घेत असाल तर खात्री करून घ्या ती रोप कुठे लावलेले त्या ठिकाणच्या प्लॉटला व्हिजिट करा त्या मालकाचा फीडबॅक घ्या आणि त्यांना त्या रोपांच्या क्वालिटी बद्दल सगळं विचारून घ्या. जर त्या रोपांची कॉलिटी चांगली असेल तर तुम्ही त्या नर्सरीमधून रोप घ्या. सगळ्या गोष्टी क्लियर केल्याशिवाय तुम्ही भूलथापांना बळी न पडता स्वतः माहिती घेऊनच रोपे खरेदी करा. या रोपांची किंमत किती आहे हा एक सब्जेक्ट विषय . म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणानुसार याची किंमत कमी जास्त असू शकते. साडेचार फूट उंचीचे रोप एक वर्षाचे असते, जे चार-पाच पानावर असतं ते रूप तुम्हाला साधारणतः तीनशे साडेतीनशे रुपयांच्या आसपास मार्केटमध्ये मिळू शकतात आता काही ठिकाणी ते स्वस्त तर काही ठिकाणी महाग पण मिळू शकेल. हे तुमच्या स्थानिक बाजारभावावर अवलंबून असेल. दोन वर्षापेक्षा जास्त वय असलेली रोपे पाचशे ते सहाशे रुपये याप्रमाणे मिळू शकतात. रोपे घेताना एक एक रोप व्यवस्थित चेक करूनच घ्यावे. रोपाचा बुंधा उंचीच्या मानाने जास्त जाड असला पाहिजे व पाने हिरवीगार.
नारळाच्या दोन झाडांमधील अंतर किती ठेवावे? तसे बघायला गेले तर हाय डेन्सिटी मॉडेल्स आजकल फळबागांमध्ये प्रचलित आहे पण नारळाच्या बाबतीत हे मॉडेल्स तेवढे उपयोगी नाहीत. नारळ लागवड करत असताना दोन झाडांमधील अंतर साधारणता पंधरा फूट किंवा वीस फुटाचे ठेवावे जेणेकरून नारळाच्या झावळ्या एकमेकांना अडचण करणार नाहीत आणि मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाशही झाडांना मिळेल व नारळ तोडणीच्या वेळी तुम्हालाही त्रास होणार नाही. आता वर म्हटल्याप्रमाणे कोलंबस जातीच्या झाडाने ५०० फळे सरासरी दिले दरवर्षी आणि तुमच्या स्थानिक बाजारात पंधरा रुपये रेट असेल तरीही एक झाड १५×५००=७५०० रुपये एवढे वार्षिक उत्पन्न देऊ शकते. अर्थात तुमचे नियोजन चोक असणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Guide to Oil Palm Plantation Methods

  A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...