Agriculture and agro industries updates, latest hi-tech agricultural practices news and information for farmers and Agripreneurs
गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४
व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा..
नोकरी धंद्यासाठी आपले हक्काचे गाव सोडून शहराकडे पलायन केलेल्या मिडल क्लास लोकांची खंत हीच की ते शहरात राहूनही सुखी नाहीत,कामाचा मोबदला योग्य तो मिळत नाही. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त पण गावी परत निघून जावे तर स्टेटस चा प्रश्न.
शेतात काबाडकष्ट करायची सवय सुटलेली असते.
पण कोरोना काळात जे काही अनुभव जन माणसांनी घेतले आणि अखेरीस जीवनाचे सत्य उलगडले.
माणसाला स्वतःच्या नेमक्या गरजा किती हे कोरोना काळाने शिकवलं, आहे त्यात समाधानी कसे राहायचे हे कोरोना काळाने शिकवलं.
कोरोना काळातच एक मोठा बदल जगाने बघितला आणि त्यातल्या त्यात आपल्या भारताने.
आणि तो बदल म्हणजे नोकरी धंद्याला असलेले शहरी लोक आपल्या गावी परतून नवनवीन उद्योगधंदे निर्माण करू लागले.
चाकरमान्या आता उद्योजक व्हायला शिकला आहे.
गेल्या चार-पाच वर्षात अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू झाले. काही शेतीपूरक व्यवसाय, खाद्यपदार्थांचे व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन कुक्कुटपालन असे असंख्य उद्योग उदयास आले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक लघुउद्योग सुरू केले.
या सगळ्यात पारंपारिक शेतीने हायटेक बिझनेस मध्ये रूपांतरण केले. नव्या शिकलेल्या पिढीने शेतीला बिझनेसचे स्वरूप दिले. आज संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला नवनवीन शेती उद्योजक पाहायला मिळतील अगदी स्वतःच्या नावाचे ब्रँड बनवून बसलेले उद्योजक.
आजचा शेतकरी हे समजू शकतो की आपल्या पिकाला आहे त्या स्वरूपात कवडीची किंमत नाही म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल थेट बाजारात न नेता त्याचे बाय प्रोडक्स बनवून विक्री करण्यास सुरुवात केली आहे यामुळे शेतीला व्यवसायाचे स्वरूप आले.
फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही स्थानिक बाजारात भाव मिळत नाही म्हणून स्वतः एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.
हे बदल घडणे आपल्या शेतीप्रधान देशासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. अशा बदलांमुळेच पारंपारिक शेतीने त्रस्त असलेल्या शेतकरी सधन होऊ शकतो आणि देशाच्या जीडीपीला हातभार लावू शकतो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Guide to Oil Palm Plantation Methods
A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...
-
Avocado Farming: A Comprehensive Guide for Indian Farmers Avocado, often considered as a "superfood," has gained immense popular...
-
A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...
-
Agritech क्षेत्र आणि रोजगार संधी Agritech क्षेत्र: पुढील ५ वर्षांत ६०,००० ते ८०,००० नवीन रोजगार संधी ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा