फळ शेती म्हटले की आपल्या मनात डाळिंब, द्राक्ष, पेरू व आंबा ही नावे पटकन येतात, पण आज आपण जाणून घेणार आहोत पाच अशा फळझाडांबद्दल जे लावून शेतकरी चांगले उत्पन्न घेऊ शकतात . बरेच शेतकरी सध्या फळ उत्पादनाकडे वळत आहेत परंतु आज आपण जी फळझाडे जाणून घेणार आहोत त्यांची लागवड खूप कमी शेतकरी करतात. शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात का होईना फळ उत्पादन केलेच पाहिजे. आपल्या शेतात झाडे लावलेच पाहिजे कारण त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो शिवाय मेहनतही कमी लागते. जर शेतकऱ्यांनी कोणत्याही फळाची झाडे लावली तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी पुढचे दहा ते पंधरा वर्षे उत्पादन मिळू शकते. पण ज्या फळझाडांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्या फळझाडांकडे सध्या तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा खूप कमी कल आहे .
•ड्रॅगन फ्रुट:
पहिले आणि चांगले उत्पन्न देणारे फळ म्हणजे ड्रॅगन फ्रुट ड्रॅगन फ्रुट या फळाच्या उत्पादनाबद्दल सध्यातरी खूप कमी शेतकऱ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात आजही खूप कमी प्रमाणात ड्रॅगन फ्रुट बद्दल माहिती आहे व उत्पादनाचे प्रमाणही खूप कमी आहे. कमी उत्पादनाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना या फळ लागवडीबद्दल चांगली माहिती मिळत नाही व या फळाला बाजार मिळेल की नाही याची शाश्वती ही नाही. पण या फळझाडांची लागवड करून आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो या फळांना बाजारात चांगला भाव मिळतो हे फळ बाजारात साधारणता 25 ते 30 रुपये प्रति फळ या भावाने सहज विकले जाते, कारण या फळांना बाजारात मागणी जास्त आहे आणि फळांचा पुरवठा खूप कमी होतो. या फळामध्ये आपल्या शरीरास लागणारे बरेच पोषक द्रव्य उपलब्ध असतात त्यामुळे डॉक्टर ही हे फळ खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट च्या झाडांची लागवड करणे हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
•ऍपल बोर:
सध्या बरेच शेतकरी ॲपल बोर लागवड करत आहेत. एप्पल बोर हे पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात घेतले जाऊ शकते. याच्या उत्पादनास पाणी कमी लागते साधारणतः दोन ते तीन वर्षांमध्ये याचे उत्पादन चालू होते व स्थानिक बाजारात या फळाला सहज 40 ते 50 रुपये प्रति किलो हा भाव मिळतो.
•अंजीर:
अंजीर उत्पादन आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंजीर खायला आवडतात पण अंजिराचे उत्पादन खूप कमी शेतकरी करतात अंजीरची झाडे लागवड केल्यानंतर जवळपास दीड ते दोन वर्षात आपल्याला उत्पन्न देण्यास सुरुवात करतात आणि एक पाच वर्षांचे झाड असेल तर बारा ते पंधरा किलो फळ हे सहज मिळते त्याच्या फळाला बाजारात चांगला भाव मिळतो ओले अंशीर बाजारात 100 ते 150 रुपये प्रति किलो तर वाळलेले 500 ते 600 रुपये प्रति किलो सहज विकले जातात म्हणून शेतकऱ्यांनी अंजीर लागवड नक्कीच केली पाहिजे यातून शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मदतही मिळू शकते.
• जांभुळ:
जांभूळ हे फळ आपण सगळेच खूप आवडीने खातो. प्रत्येकाच्या शेतात जांभळाचे एक का होईना झाड नक्कीच असते, परंतु ते देखील विक्रीसाठी म्हणून खूप कमी शेतकरी जांभळाच्या झाडांची लागवड करतात. काळे जांभूळ हे फळ शुगर सारख्या रोगावर उपाय कारक आहे म्हणून बरेच लोक जांभुळ खाणे पसंत करतात आणि बऱ्याच औषधी बनवणाऱ्या कंपन्या जांभळाच्या बियांचा वापर आपल्या औषधांमध्ये करतात . महत्वाचे म्हणजे जांभळाच्या झाडांची लागवड करण्यासाठी खर्चही खूप कमी येतो, जास्त पाण्याची गरज नाही. जांभळांना बाजारात भावही चांगला मिळतो ही झाडे आपण शेतांमध्येच नाही तर बंधाऱ्यावर सुद्धा लावू शकतो. जांभूळ लागवड हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
• फणस:
तसे बघायला गेले तर फणस हे कोकणात येणारे फळ आहे, फणसाची लागवड आपल्या महाराष्ट्रात कमी शेतकरी करतात. पण शहरी भागात या फळाची बाजारात चांगली मागणी आहे आणि उत्पादनाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे भावही चांगला मिळतो. शेतकऱ्यांनी फणसाची लागवड ही नक्कीच केली पाहिजे.
शेतकऱ्यांना आपल्या पारंपारिक शेती व्यतिरिक्त नवनवीन प्रयोग आपल्या शेतात करणे गरजेचे आहे.
वरती नमूद केलेल्या फळझाडांची लागवड ही एक असाच नवीन प्रयोग ठरू शकतो.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा