मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

ड्रॅगन फ्रुट शेती: व्यावसायिक शेती , लागवड आणि नियोजन.

 

ड्रॅगन फ्रुट शेती: 



 ड्रॅगन फ्रुट हे एक उष्णकटिबंधीय फळ आहे ज्याची मागणी भारतात अलीकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. हे फळ दिसायलाही आगळे वेगळे आणि खूपच पौष्टिक मानले जाते, आणि कदाचित म्हणूनच हे फळ सध्या चर्चेत आहे. हे फळ मुख्यतः मध्य अमेरिकेतील आहे परंतु आता भारतासह जगभरात अनेक ठिकाणी पिकवले जात आहे. 


भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट शेती हात तुलनेने फार नवीन उद्योग आहे , तरीही देशातील बऱ्याच राज्यांमध्ये या फळाला अनुकूल असे वातावरण उपलब्ध असल्यामुळे याच्या लागवडीचे प्रमाण वाढत चालले आहे.


भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान तर दक्षिणेकडे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ असे उष्णकटिबंधीय व उपउष्णकटिबंधीय हवामान असलेले प्रदेश तसेच कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशांत ही ड्रॅगन फ्रुट शेतीचे प्रमाण वाढत आहे. 


माती आणि हवामान:


ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी खूप पाणी धरून ठेवणारी माती काही कामाची नाही, खडकाळ मुरमाळ अशा हलक्या मातीच्या जमिनी ज्यातून पाण्याचा निचरा होऊ शकतो अशा जमिनी लागवडीसाठी योग्य असतात. ड्रॅगन फ्रुट 25° ते 35° तापमान असलेल्या भागात चांगले वाढते. ड्रॅगन फ्रुटच्या वाढीसाठी पूर्ण सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. 


ड्रॅगन फ्रुट ची लागण कशी करावी?


ड्रॅगन फ्रुट्स त्यांच्या कटिंग वापरून वाढवले जातात जे पिकलेल्या रोपांपासून घेतले जातात. साधारणतः एक ते दीड फूट लांब कटिंग घेऊन त्यांना काही काळ सुकवून नंतर मातीमध्ये लागण केली जाते. मग याची रोपे बनवून विक्रीसाठी उपलब्ध केले जातात. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील शासनमान्य नर्सरीतून याची रोपे मागू शकता.


ड्रॅगन फ्रुट ची लागवड करत असताना झाडाची आरोग्यपूर्ण वाढ व्हावी म्हणून दोन झाडांमधील अंतर योग्य असणे आवश्यक असते. प्रत्येक झाडा दरम्यान तीन मीटर अंतर ठेवावे. याचा फायदा असा की झाडांना योग्य प्रमाणात ऊन तसेच हवा मिळते आणि रोगांचा धोकाही कमी होतो.


ड्रॅगन फ्रुट हे क्लाइंबर स्टेटस असल्यामुळे सपोर्ट दिल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांसाठी हाच एक मोठा खर्च आहे पण एकदाच. सपोर्टसाठी बांबूचे फ्रेमिंग केल्या जाऊ शकतात आणि आजकाल तर स्टील फ्रेमिंग तसेच सिमेंट चे पोल रिंग स्ट्रक्चर बाजारात उपलब्ध आहेत. 


पाणी व खत व्यवस्थापन: 


ड्रॅगन फ्रुट ला तसे पाणी कमी लागत असले तरी फुल आणि फळाच्या सेटिंगच्या काळात नियमित पाणी देणे गरजेचे असते. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी वाचते व झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळते. या झाडांनाही खत व्यवस्थापनाची आवश्यकता असते. झाड लावत असतानाच आधीच शेतात शेणखत गांडूळ खत तसेच सोबत एन पी के खत यांचा वापर करावा जेणेकरून रूपाची योग्य वाढ होऊन लवकरात लवकर उत्पादन देण्यास तयार होतील.



ड्रॅगन फ्रुट साधारणतः लागवडीपासून दीड ते दोन वर्षानंतर फळ देण्यास सुरुवात होते. फुल धारणीनंतर 30 ते 40 दिवसांमध्ये फळ तयार होते. फळाचा रंग जेव्हा गडद गुलाबी व्हायला सुरुवात होते तेव्हा बाजारात नेण्या योग्य होतात.


भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट शेती शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे कारण हे एक बहुवार्षिक पिक असून भरपूर नफा देणार ठीक आहे. सुरुवातीला जरी खर्च भरपूर असला तरी बाजारात अत्याधिक मागणी आणि चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी भरपूर नफाच घेऊन जाते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Guide to Oil Palm Plantation Methods

  A Comprehensive Guide to Oil Palm Plantation Methods Oil palm plantations play a vital role in the global agricultural landscape, providi...